Team Agrowon
हरियाणामधील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाच्या एमएसपीच्या मागणीसाठी दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखून बसले होते.
सरकारने यापूर्वी सूर्यफुलासाठी प्रति क्विंटल 4800 रुपये दर निश्चित केला होता. त्यामुळे शहााबाद येथील राष्ट्रीय महामार्ग ६ जून रोजी सात तास रोखून धरण्यात आला.
महामार्ग अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलनक आक्रमक झाले
तसेच पोलिस प्रशासनाने भाकियु नेते गुरनाम सिंग चधुनी आणि इतर आठ नेत्यांनाही अटक करण्यात आली
नेत्यांच्या सुटकेसाठी आणि सूर्यफुलाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी पिपळी धान्य बाजारात मोर्चा काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचवेळी रॅली सोडून दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजता रास्ता रोको केला
त्यानंतर आंदोलनस्थळावरच सरकार आणि समितीमध्ये सामंजस्य करार झाल्याचे जाहीर करण्यात आले.
आंदोलनादरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व नेत्यांच्या सोडण्याबाबत सरकारने सहमती दर्शवली.
सरकारने सूर्यफुलाची ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे मान्य केले. तसेच भारपाई योजनेंतर्गत खरेदी किंमत किंवा नुकसानभरपाईची रक्कम (रु. 1000 प्रति क्विंटल) वाढवून शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.