Anuradha Vipat
साखर ही चवीला गोड असली तरी, जास्त प्रमाणात सेवन केल्यास ती शरीरासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकते.
साखर पचवताना यकृतावर प्रचंड ताण येतो. साखरेचे रूपांतर चरबीत होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढल्याने शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते.
साखरेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
साखर शरीरातील लेप्टिन विस्कळीत करते. यामुळे जास्त भूक लागते आणि पोटाचा घेर तसेच वजन वेगाने वाढते.
साखरेमुळे रक्तातील प्रथिनांचे 'ग्लायकेशन' होते, ज्यामुळे त्वचेवरील लवचिकता कमी होऊन अकाली सुरकुत्या पडतात.
साखर जास्त खाल्ल्याने मेंदूत डोपामाइनची लाट येते, ज्यामुळे साखरेचे व्यसन लागते.