Anuradha Vipat
झोप ही आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. कमी झोपेमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.
कमी झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन वाढतात आणि भूक कमी करणारे हार्मोन कमी होतात ज्यामुळे वजन वाढू शकते.
झोपेची कमतरता मूड स्विंग्स, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते ज्यामुळे संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास लक्ष केंद्रित करणे, विचार करणे आणि निर्णय घेणे कठीण होऊ शकते
कमी झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका वाढतो.
झोपेची कमतरता इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते