Team Agrowon
यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. कोकणात दरवर्षी ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा कलमांना मोहोर यायला सुरवात होते.
परंतु यावर्षी नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजूनही मोहोर आलेला नाही.
थंडी उशिरा सुरू झाल्याने ८० टक्क्यांहून अधिक कलमांच्यावर अजून पालवीच दिसत आहे.
यंदा ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. थंडी उशिरा सुरू झाली. तापमानात चढ-उतार होत आहेत.
त्याचा परिणाम मोहोर येण्यावर झालाय. त्यामुळे यंदा आंबा हंगाम महिनाभर लांबेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.
बहुतांश कलमांना डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगाम मार्च अखेरीपर्यंत सुरू होईल, असे बागायतदारांनी सांगितलं.