Anuradha Vipat
पहिलीच वेळ जिममध्ये जाणाऱ्यांसाठी व्यायामाची सुरुवात करताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी किमान ५ ते १० मिनिटे हलका वॉर्म-अप करा. व्यायाम संपल्यावर शरीर पूर्वस्थितीत आणण्यासाठी 'कूल-डाऊन' स्ट्रेचिंग नक्की करा.
कमी वजनासह व्यायामाची योग्य पद्धत आणि पोश्चर शिकून घ्या. हालचाल अचूक जमू लागली की हळूहळू वजन वाढवा.
जिममधील ट्रेनरकडून तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार 'वर्कआउट प्लॅन' तयार करून घ्या आणि मशीन कशी वापरायची ते समजून घ्या.
आठवड्यातून ६ किंवा ७ दिवस सलग वर्कआउट करू नका. सुरुवातीला आठवड्यातून ४ ते ५ दिवस व्यायाम पुरेसा आहे.
व्यायामादरम्यान शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका, थोडे-थोडे पाणी पीत राहा. तसेच जिम सुरू केल्यावर आहारात प्रोटीन आणि चांगल्या कर्बोदकांचे प्रमाण वाढवा.
केवळ जिम करून रिझल्ट मिळत नाहीत, त्यासाठी शरीराला योग्य इंधन मिळणे गरजेचे आहे.