Peru Market : पेरुचे भाव दबावातच

Anil Jadhao 

राज्यात मागील काही वर्षांपासून पेरुची लागवड वाढली.

मात्र पेरुवर प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळं थेट खाण्यासाठीच पेरुचा वापर होतो.

राज्यात वाढत्या थंडीमुळे सध्या पेरुला मागणी कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

पण वाढलेल्या उत्पादनाला मागणी कमी राहत असल्यानं पेरु उत्पादक अडचणीत आले आहेत.

सध्या पेरुला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळतोय.

पुढे उन्हाचा चटका वाढल्यानंतर पेरुच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज पेरू व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

cta image