Guava Benefits : पेरूमुळे रक्तदाब नियंत्रणास मदत, पेरूच्या फायद्याच्या गोष्टी वाचा

sandeep Shirguppe

पेरू खाण्याचे फायदे

सध्या पेरूचे उत्पादन वाढल्याने बाजारात पेरूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. पेरूत व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ए यासारखे पोषकघटक मोठ्या प्रमाणात मिळतात.

Guava Benefits | agrowon

पेरूत भरपूर फायबर

पेरूमध्ये शरिराला लागणारे फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, यासारखे महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो. हे दोन्ही पेरू खाल्याने अनेक फायदे मिळतात.

Guava Benefits | agrowon

व्हिटॅमीन सी असल्याने थकवा कमी

पेरूत व्हिटॅमीन सी असल्याने थकवा जाणवत नाही. तसेच तुम्ही रोज एक पेरू खाल्यास त्वचा तजेलदार राहते. वजन आटोक्यात राहण्यासाठीही याचा उपयोग होतो.

Guava Benefits | agrowon

पोट साफ होण्यास मदत

पोट साफ होत नसेल अथवा हृदयाचे आजार, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Guava Benefits | agrowon

पेरूमध्ये रोगप्रतिकार शक्ती

पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट्ससह उपयुक्त फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते.

Guava Benefits | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

पेरूत ग्लायसेमिक इंडेक्स हा अत्यंत कमी असतो यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांसाठी पेरू खाणे फायदेशीर असते.

Guava Benefits | agrowon

रक्तदाब नियंत्रणासाठी फायदा

पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्समुळे प्रमाण भरपूर असते रक्तदाब, तसेच अतिरिक्त बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. त्यामुळे पेरू खाण्यामुळे रक्तवाहिन्या सुरळीत चालतात.

Guava Benefits | agrowon

पेरू खाण्याचे तोटेही

पेरू खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात पेरू खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच यामुळे कफ देखील वाढू शकतो.

Guava Benefits | agrowon
Water level | Agrowon
आणखी पाहा...