Team Agrowon
सकाळच्या वेळी दव पडत असलेल्या ठिकाणी द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढून फळकुज होण्याची शक्यता आहे.
साधारणपणे ८० ते ९० टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणामध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
सध्याच्या अनुकूल परिस्थितीमध्ये नियंत्रणात आलेला डाऊनी पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
बऱ्याच वेळा रोगाची लक्षणे, वनस्पती वाढ नियंत्रकांचे अधिक्य आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारी लक्षणे यामध्ये सारखेपणा दिसून येतो.
डाऊनीची योग्य ओळख पटवून प्रभावी नियंत्रणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना कराव्यात.
बदलत्या वातावरणामध्ये आर्द्रता, तापमान आणि ढगाळ या अनुकूल हवामान घटकांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.