Team Agrowon
दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाच प्रमाण हळू हळू घटत. अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात.
शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेल्या पिकांना हिरवळीची खते असे म्हणतात.
आंतरपीक घेतलेले पीक, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्याच शेतात नांगरून मिसळले जाते, त्यास शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात.
हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो.
पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नघटक व इतर सूक्ष्म‚ अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात.