Anil Jadhao
राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. त्यामुळे मिरचीचे दर तेजीत आहेत.
राज्यात ऑक्टोबरमध्ये जवळपास २० दिवस सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.
पुणे, मुंबई आणि नागपूर तसेच कोल्हापूर बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी जास्त दिसते.
मात्र इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत.
सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २ हजार ७०० ते ४ हजार ५५० रुपये दर मिळतोय.
हिरव्या मिरचीचे हे दर पुढील दोन महिने टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.