Team Agrowon
ग्रामप्रिया ही जात कुक्कुट परियोजना निदेशालय, राजेंद्र नगर, हैदराबाद येथील संशोधन केंद्राने गावठी कोंबडी पासून तयार केलेली जात आहे.
या कोंबड्या रंगीत आणि पांढऱ्या अशा दोन्ही रंगामध्ये असतात.
पांढऱ्या रंगाच्या ग्रामप्रिया कोंबड्या या प्रामुख्याने अंड्याच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत.
या कोंबड्या वयाच्या १६० ते १६५ दिवसानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात.
विविध रंगी पंखामुळे ही जात दिसायला देखणी व आकर्षक वाटते.
विविध रंगी पंखामुळे ही जात दिसायला देखणी व आकर्षक वाटते.
शत्रूपासून संरक्षण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही जात परसातील कुक्कुटपालनासाठी अतिशय योग्य आहे.