Wheat Stock: गव्हाचा बफर स्टाॅक निम्म्याने घटला

Anil Jadhao 

सरकारी गोदमांमध्ये एक नोव्हेंबरला २१० लाख टन गव्हाचा साठा होता. मात्र याच तारखेला मागीलवर्षीचा साठा ४२० लाख टन होता.

पण सरकारच्या अन्नसुरक्षा नियमाप्रमाणे एक नोव्हेंबरला २०५ लाक टन गव्हाचा बफर स्टाॅक असणे गरजेचे होते. मात्र सध्याचा साठा हा ५ लाख टनाने अधिक आहे.

एक ऑक्टोबरला सरकाच्या गोदामांमध्ये २२७ लाख टन गहू शिल्लक होता. म्हणजेच ऑक्टोबमध्ये १७ लाख टन गहू सरकारने वितरित केला. 

सध्या  बाजारात गव्हाचे दर जवळपास १० टक्क्यांनी वाढले आहेत. प्रक्रिया उद्योग सरकारकडे खुल्या बाजारात बफर स्टाॅकमधील गहू विक्री करण्याची मागणी करत आहे. मात्र साठा कमी असल्याने सरकारने या मागणीवर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. 

देशात यंदा १ हजार १०० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. त्यातच सध्या गहू पेऱणीसाठी पोषक वातावरण आहे. पेराही चांगला होऊ शकतो. त्यामुळे यंदा देशातील गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

देशातील रब्बीच्या पेरण्या ऑक्टोबच्या सुरुवातीपासून सुरु झाल्या. देशात एक ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत ४५ लाख हेक्टरवर गव्हाचा पेरा केला. मागील वर्षी याच काळात झालेल्या पेरणीपेक्षा यंदा जवळपास १० टक्क्यांनी क्षेत्र वाढलं आहे.

cta image