Team Agrowon
लॉकडाऊन मध्ये सगळे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे बेरोजगारी वाढत होती. याच गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणली.
ही योजना लघु (सूक्ष्म) आणि लहान खाद्य व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळेनवव्यवसायिकांना फायदा होणार आहे.
या योजनेंतर्गत, व्यवसाय करणाऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि लहान आणि सूक्ष्म अन्न व्यवसाय आणि महसूल यासाठी मदत केली जाते.
याशिवाय नव्य व्यवसायिकांना प्रशिक्षण, प्रशासकीय मदत, एमआयएस योजनेची प्रसिद्धी या सुविधाही लोकांना मोफत दिल्या जातात.
ही योजना 2020-21 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे, 2024-25 पर्यंत चालवली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील लहान-लहान खाद्य उद्योगांच्या महसुलात प्रगती साधता येतात.
या योजनेअंतर्गत 5 वर्षांसाठी 10000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये केंद्राचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा असणार आहे.