Team Agrowon
भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असंत. यामुळे शेतकऱ्यांच्या फायदा होतो.
अनेकदा शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. यासाठी शेतकऱ्यांना योग्य व्याजात पैसे मिळावे यासाठी देखील योजना सरकार आखत असतं.
यातीलच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणं सोप झालं आहे. यामुळे काही सुविधा देखील मिळत आहेत.
शेतकऱ्यांना बँकांकडून अत्यंत कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने सुरू केले आहे.
या किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते, ज्याचा व्याजदर 2% इतकाच असतो.
शिवाय शेतकऱ्यांनी या कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्यांना सरकारकडून आणखी तीन टक्के अनुदान दिले जाते.
ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ मिळतो.
पीक विमा योजनेमुळे पिकांबाबत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास शेतकऱ्यांना मदत केली जाते.