टीम ॲग्रोवन
यावर गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी म्हणाले की, "तेलंगणामध्ये दुधाचा तुटवडा असल्याने आम्ही हैदराबादच्या जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात दूध संकलन करण्याच्या प्रयत्नात होतो. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राची निवड केली आहे."
ते पुढे म्हणाले की, "सध्या आम्ही दिवसाला 80,000 लिटर दुधाचं संकलन करायला सुरुवात केली आहे.
मागच्या वर्षी हेच संकलन दिवसाला 15,000 लिटरच्या आसपास होतं. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात दूध संकलन केंद्र उघडली."
दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 10 मिल्क प्रोसेसिंग युनिट चालवणाऱ्या गोदरेज जर्सीचे महाराष्ट्रात नागपूर मध्ये एक युनिट आहे.
कंपनी दररोज 6.5 ते 7 लाख लिटरच्या आसपास मिल्क प्रोसेसिंग करते. तर या युनिटची प्रोसेसिंग कपॅसिटी 13 लाख लिटर इतकी आहे.
कंपनीच्या एकूण विक्रीत दुधाचा वाटा 67 टक्के इतका आहे. तर उर्वरित वाटा हा दुधापासून तयार होणाऱ्या उत्पादनाचा आहे.
कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे दुग्धजन्य पदार्थांचा महसुलातील हाच वाटा पुढच्या काही वर्षांमध्ये वाढून 40 टक्क्यांच्या आसपास जाईल.
गोदरेज जर्सी विदेशी बाजारपेठेत आपला जम बसवण्याच्या तयारीत आहे.
आम्ही मालदीव, दुबई आणि यूएई सारख्या बाजारपेठांमध्ये तूप निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिकडे तुपाच्या किंमतीही जास्त आहेत. ही एक मोठी बाजारपेठ आहे.