Team Agrowon
देशभरात ईद-उल-अजहा (बकरीद) साजरी केली जात आहे. त्याचबरोबर कुर्बानीसाठी जनावरांची खरेदीही सुरू झाली आहे.
परंपरेनुसार या दिवशी बोकडाचा बळी दिला जातो. त्यासाठी अनेक महिने बकरे तयार केले जातात.
या बकऱ्या थेट अल्लाहकडे जातात असे म्हणतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि बिहारमध्ये जमनापारी जातीच्या बोकडाला चांगली मागणी असते.
पाटण्यातील बेली रोडवर बाकरा मंडई प्रसिध्द आहे. या मंडईत यंदा विक्रीस आलेल्या बकऱ्यांना चक्क अभिनेता सलमान आणि शहारूख खानची नावे देण्यात आली होती.
सलमान खान, शाहरुख खान आणि शेर खान यांच्या नावावर असलेल्या बकऱ्याची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.
हे बोकड तोतापुरी आणि बीटल या जातीचे असून त्यांचे वजन अंदाजे १५० किलो आहे.