Team Agrowon
ऊस आणि इतर पिकांवर हुमणी हळीचा प्रादुर्भाव वाढल्याच दिसून येत आहे. सहसा उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो.
हुमणी या किडीची अळी जमिनीत राहून पिकाची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे झाडे सुरुवातीला पिवळे पडून सुकतात आणि नंतर वाळून जातात.
पिकामध्ये आंतरमशागत करा. निंदणी आणि हुमणीच्या अळ्या जमिनीवर येतात. अशा जमिनीतून बाहेर पडलेल्या अळ्या पक्षी वेचून खातात किंवा त्या कडक उन्हामुळे मरतात.
शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी द्या. हे पाणी काही काळ शेतात साचवून ठेवा. त्यामुळे या अळ्या गुदमरून मरतील.
रायायनिक प्रक्रिया करुन देखील प्रादुर्भाव कमी करता येतो. अशावेळी शेणखतात अळ्यांच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशी वापरतात.
मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली बुरशीचा उभ्या पिकामध्येही वापर करता येतो. त्यासाठी प्रति हेक्टरसाठी दहा किलो मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली बुरशी वापरायची आहे.
हे केल्याने या बुरशीमुळे हुमणीच्या अळ्यांना रोग होतो. उसातील अळ्या सहजपणे मरतात. असं नियंत्रण करता येईल.