Sanjana Hebbalkar
लसूण हा रोजच्या जेवणात वापरला जातो. लसूण जेवणाची चव वाढवते. अनेकदा लसून कच्च देखील खाल्ल जातं.
लसणाचे अनेक गुणधर्म सांगितले जातात. लसणाची पेस्ट जेवणाची चव वाढवते. आयुर्वेदातदेखील लसणाचं महत्त्व सांगितलं जातं.
लसणाने वजन कमी होण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो याचं कारण म्हणजे रक्तातील साखरचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
स्त्रीयांनी गरोदरपणात लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसूण खाल्लाने बाळाचे वजन वाढण्यास मदत होते.प्रीक्लेम्पसिया पासून स्त्रीचा बचाव होण्यास मगत होते
पावसाळ्याचा महिना आला की सर्दी-खोकल्याने त्रास जाणवायला लागतो. मात्र लसूण खाल्यानंतर या समस्येपासून आराम मिळू शकतो.
कच्च्या लसणामुळे रक्तदाब आणि टेस्टोस्टेरॉनला फायदा होतो आणि यामुळे पुरुषांची लैगिक क्षमता वाढते असं अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
नियमित लसणाचे सेवन केल्यानं कर्करोगापासून तुमचा बचाब होऊ शकतो. शिवाय त्वच्या आणि तोडांच्या संसर्गपासूनदेखील बचत होते.