Anuradha Vipat
आज २२ जानेवारी २०२६ रोजी गणेश जयंती म्हणजेच माघी गणेशोत्सव साजरी केली जात आहे.
हिंदू पंचांगानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला म्हणून हा दिवस 'गणेश जयंती' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो.
आज आपण पाहूयात गणपती बाप्पाला कोणते फूल अत्यंत प्रिय आहे आणि ते का?
भगवान गणेशाला लाल जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे या फुलाच्या आवडीमागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारण आहे.
लाल रंग हा शक्ती, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि शक्तीचे रूप असल्याने लाल जास्वंद त्यांच्या गुणधर्मांशी जुळते.
लाल जास्वंदामध्ये विश्वातील 'गणेश तत्त्व' किंवा पवित्र लहरी स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असते.
जास्वंदाच्या फुलाची रचना गणेशाचे शुभ चिन्ह असलेल्या 'स्वस्तिका'सारखी दिसते, म्हणून हे फूल त्यांना प्रिय आहे असे मानले जाते.