Sanjana Hebbalkar
आज सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
मोदक,शिरा, गोड पदार्थ असे वेगवेगळे रुचकर पदार्थ सगळ्याच्या घरी नैवद्य म्हणून बनवले जात आहेत.
अनेकांनी यावेळी आरोग्याची काळजी घेत हेल्दी मोदक बनवले आहेत. आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे
अशातच आरोग्याच्या काळजी घेत ताणतणाव दूर करण्यासाठी गणेशमुद्रा देखील उपयोगाची ठरत आहे.
गणेशमुद्रा आणि गणेश नमस्काराने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. या आसनामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात
या मुद्रेचा दररोज सराव केल्यामुळे डाऊन सिंड्रोम, डिस्लेक्सिआ, अटेंशन-डेफिसिट, हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डरपासून आराम मिळतो.
उत्तम पचनसंस्था आणि वजन कमी करण्यासाठी ही गणेश मुद्रा महत्त्वाची ठरते. यामुळे रक्ताभिसरण संस्था देखील सुधारते.