Team Agrowon
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत मल्लांनी महाराष्ट्राचा नावलौकीक सातासमुद्रापार पोहचवला आहे.
पण खऱ्या अर्थानं जगभरात कुस्तीमध्ये दबदबा राहिला तो गामा पैलवानाचा. गुलाम मोहम्मद बक्श यांना जगभरात गामा पैलवान नावाने ओळखले जाते.
गामा यांचा जन्म स्वातंत्र्योपूर्व काळातील्या भारतात गामा यांचा जन्म पाकिस्तानातील अमृतसरमध्ये झाला.
गामा यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून पैलवानकीला सुरूवात केली. दगडाच्या डंबेल्सपासून ते कसरत करत.
जगभरात आपल्या मल्लविद्येचा डंका वाजविलेल्या गामा यांचा खुराकही तगडा होता. गामा यांची उंची ५ फूट ७ इंच तर वजन जवळपास ११३ किलो होते.
गामा आपल्या दैनंदिन खुराकात १० लिटर दूध, अर्धा लिटर तूप, सहा देशी कोंबड्या, फळे यांचा समावेश होता.
गामा पैलवान दिवसाला ५ हजार बैठका आणि १ हजार जोर मारायचे. अशा या दिग्गज मल्लाचा मृत्यू २३ मे १९६० ला लाहोर पाकिस्तानमध्ये झाला.