G-20 Pune : जी-२० च्या परदेशी पाहुण्यांची पुण्यातील ऐतिहासिक वारसास्थळांना भेट

Team Agrowon

जी-२० परिषद

सध्या पुण्यात जी-२० कार्यगटाच्या बैठकींसाठी जगभारातील प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता.२०) पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांना भेट दिली.

G-20 Pune | Agrowon

हेरिटेज वॉक

परदेशी पाहुण्यांसाठी 'हेरिटेज वॉक' अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती.

G-20 Pune | Agrowon

शनिवार वाडा

शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले, तर लाल महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेत स्तिमितही झाले.

G-20 Pune | Agrowon

जी-२० प्रतिनिधी

शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर या प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

G-20 Pune | Agrowon

लाल महाल

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

G-20 Pune | Agrowon

ऐतिहासिक वारसास्थळे

काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

G-20 Pune | Agrowon

पारंपरिक कला

पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. यावेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला. पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या.Ajh

G-20 Pune | Agrowon
Ajit Pawar | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....