Fruit Export : आता ‘फ्रूटनेट’मध्ये पेरू, अंजीर, सीताफळाचाही समावेश होणार

Team Agrowon

महाराष्ट्र आघाडीवर

फळांच्या निर्यातीसाठी प्रणाली तयार करण्याचे काम कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)कडून हाताळले जाते. परंतु त्यासाठी उपयुक्त माहिती पुरवणे, पाठपुरावा आणि निर्यातक्षम फळ लागवडीच्या प्रयोगात इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे.

Fruit Export | Agrowon

निर्यातक्षम फळबागांच्या नोंदणीसाठी ‘ग्रेपनेट

‘‘निर्यातक्षम फळबागांच्या नोंदणीसाठी ‘ग्रेपनेट’ नावाची प्रणाली तयार करण्याचे काम राज्याने सर्वप्रथम २००५ मध्ये केले होते. निर्यातक्षम द्राक्षासाठी त्या वेळी ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून पहिल्या वर्षी ५० कोटी रुपयांची द्राक्षे निर्यात झाली होती.

Fruit Export | Agrowon

निर्यातीसाठी विविध प्रणाली विकसीत

‘अपेडा’ने आतापर्यंत ग्रेपनेट, मॅंगोनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, ओनियन नेट, फ्रूटस नेट तसेच सेंद्रिय प्रमाणित शेतीमाल निर्यातीसाठी ट्रेसनेट अशा प्रणाली विकसित केल्या आहेत. या प्रणातील शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याशिवाय शेतीमाल निर्यात केला जाऊ शकत नाही.

Fruit Export | Agrowon

४२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी

आता याच ग्रेपनेट प्रणालीत ४२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याद्वारे होणारी निर्यातदेखील दोन हजार ३०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. यामुळे इतर पिकांसाठीदेखील हळूहळू प्रणाली विकसित केल्या गेल्या.

Fruit Export | Agrowon

सीताफळ, पेरू व अंजिराची नोंदणी सुरू

आता फ्रूटनेटमध्ये केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, बोर, लिची, अननस, वूड अॅपल, वॉटर सिस्टनेट याबरोबरच निर्यातक्षम सीताफळ, पेरू व अंजिराची नोंदणी सुरू करण्यात आली आहे,’’ अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली.

Fruit Export | Agrowon

मोफत नोंदणी

कोणत्याही शेतकऱ्याला केवळ एक अर्ज, सातबारा उतारा, निर्यातक्षम बागेचा नकाशा आणि आधारपत्र असल्यास मोफत नोंदणी मिळवून दिली जाते.

Fruit Export | Agrowon

निर्यातक्षम शेतीची पाहणी

गावातील कृषी सहायकाकडे ही कागदपत्रे देताच प्रथम निर्यातक्षम शेतीची पाहणी केली जाते व सहायकाकडून शेतकऱ्याचा अर्ज ऑनलाइन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो.

Fruit Export | Agrowon

बारकोडसह यूसीजीसी असलेले प्रमाणपत्र

नोंदणी अर्ज मिळताच कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला बारकोडसह यूसीजीसी (युनिक कॉम्प्युटर जनरेटेड कोड) असलेले प्रमाणपत्र तयार केले जाते. तालुका कृषी अधिकाऱ्याकडून हे पत्र शेतकऱ्याला मिळते.

Fruit Export | Agrowon

शेतकऱ्याची नोंद अपेडाकडून

विशेष म्हणजे असे प्रमाणपत्र मिळताच संबंधित शेतकऱ्याची नोंद अपेडाकडून घेतली जाते. या शेतकऱ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक ‘अपेडा’च्या संपर्क दैनंदिनीत समाविष्ट केला जातो. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थ व दलालाविना देशभरातील निर्यातदार, व्यापारी या शेतकऱ्यांशी संपर्क करू शकतात, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Fruit Export | Agrowon

निर्यातक्षम बागेची नोंदणी शेतातून करणे शक्य

निर्यातक्षम बागेची नोंदणी ऑनलाइन करण्यासाठी शेतकऱ्यांकरीता गूगल प्ले स्टोअरवर ‘फार्म कनेक्ट मोबाइल’ नावाचे उपयोजन (अॅप्लिकेशन) उपलब्ध आहे. त्यात आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करताच ओटीपी टाकताच कोणत्याही ग्रेपनेट, फ्रूटनेट किंवा कोणत्याही नेटवर नोंदणी करता येते. सातबारा स्कॅन करून अपलोड केल्यास ऑनलाइन नोंदणी होते.

Fruit Export | Agrowon
Water Level | Agrowon