Anuradha Vipat
कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि विशेषतः मधुमेह नियंत्रण मिळवण्यासाठी गुणकारी मानले जाते.
आयुर्वेदानुसार कारल्याची चव आणि त्याचे गुणधर्म अत्यंत कडू आणि उष्ण असतात.
कारल्याची भाजी किंवा ज्यूस प्यायल्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात विषारी प्रक्रिया किंवा गंभीर रिॲक्शन होऊ शकते.
कारले खाल्यानंतर लगेच किंवा काही वेळात दूध पिणे अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि उलट्या होऊ शकतात.
कारल्यासोबत किंवा कारले खाल्यानंतर मुळा खाल्ल्याने शरीरात कफ आणि पित्ताचा त्रास वाढतो.
कारल्यामधील कडू घटक आणि दह्यामधील आंबट घटक एकत्र आल्यास पचनक्रिया पूर्णपणे बिघडते.
कारले खाल्यानंतर लगेच भेंडीची भाजी खाणे पोटासाठी जड ठरते.