Anuradha Vipat
पचनशक्ती सुधारण्यासाठी काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे पचनाच्या समस्या कमी होऊ शकतात.
जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते आणि पचनक्रिया मंद होऊ शकते.
काही लोकांना कृत्रिम स्वीटर्समुळे पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतो.
दारू आणि शीतपेये यांचे अतिसेवन पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम करू शकते.
लैक्टोज इनटॉलरन्स असलेल्या व्यक्तींसाठी दुग्धजन्य पदार्थ पचनास त्रासदायक ठरू शकतात.
जास्त चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ असे पदार्थ पचनासाठी जास्त वेळ घेतात आणि अपचनास कारणीभूत ठरू शकतात.
मसालेदार पदार्थांमुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.