Team Agrowon
पंढरपुरात आज विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा करण्यात आली
भाविकांना दर्शन देण्यासाठी उभ्या असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवठा प्रक्षाळपूजेद्वारे काढला जातो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आषाढी यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा केली जाते.
प्रक्षाळ पूजा करण्यासाठी श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या मंदिराच्या गर्भगृहास देशी-विदेशी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप आणि संत नामदेव पायरी आदी ठिकाणी फुलांची सजावट केली आहे.
गुलाब, झेंडू, मोगरा, जरबेरा, ऑर्किड, गुलछडी यासह अन्य २१ प्रकारच्या फुलांनी देवाचा गाभारा आणि मंदिर सजवले आहे. यासाठी सुमारे ५ टन फुलांचा वापर केला आहे.
विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन अगदी प्रसन्न झाल्याचे वातावरण मंदिरात तयार झाले आहे.