Team Agrowon
फिश प्रसादम या दम्याच्या आजारावरील रामबाण औषधाचे वाटप हैद्राबादमध्ये करण्यात आले.
दम्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांसाठी फिश प्रसादम हा रामबाण इलाज असल्याचे मानले जाते.
दरवर्षी मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर दोन दिवस दम्यावरील या औषधाचे वाटप हैद्राबादच्या बाथिनी कुटुंबियांकडून केले जाते.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून फिश प्रसादम औषधाचे वाटप बंद होते. मात्र, यंदा ९ आणि १० जून रोजी औषधाचे वाटप करण्यात आले.
जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पध्दतीने तयार केलेलं औषध लावले जाते आणि हा जिवंत मासा थेट दम्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या घशात सोडला जातो.
देशभरातून लाखोंच्या संख्येने दमाग्रस्त रुग्ण हा रामबाण उपचार घेण्यासाठी हैद्राबादमध्ये येत असतात. याशिवाय काही परदेशी नागरिकही हा उपचार घेण्यासाठी येत असतात.
तेलंगाणाचे पशुसंवर्धनमंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते यंदा फिश प्रसादम औषधाच्या वितरणाची सुरूवात करण्यात आली.