Team Agrowon
कोणत्याही प्रकारचे जेवण मसाल्यांशिवाय होत नाही. त्यातही भारतीय मसाल्यांना मोठी मागणी आहे.
केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये विलायचीचे उत्पादन घटले आहे. मागील १५ दिवसांत विलायचीचा प्रतिकिलो दर २१०० ते २,३५० रुपयांवरून २४०० ते २,६८० रुपयांवर पोहोचला
लाल मिरचीचे यंदा जवळपास २० टक्क्यांनी वाढले आहेत
गेल्या सहा महिन्यांत सुंठीचे दर दुप्पट झाले आहेत. सध्या सुंठीचा दर प्रतिकिलो ४०० रुपये आहे.
काळे मिरे, शाहजिरा या दोन्हींच्या दरांत प्रतिकिलो १०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
जिरे जे दोन महिन्यांपूर्वी २५० रुपये होते ते आता ७०० रुपये किलो झाले आहे.
जेवणातील मसाल्याचे प्रमाण कमी ठेवले तरी हे घटक पूर्णत: वगळता येत नाहीत. त्यामुळे वाढलेल्या दराचा फटका सामान्यांना बसत आहे.