Anuradha Vipat
गर्भधारणा होण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत
२८ दिवसांच्या मासिक पाळीमध्ये पाळीच्या पहिल्या दिवसापासून १४ व्या दिवशी ओव्हुलेशन होते. याच्या २-३ दिवस आधी आणि नंतरचा काळ गर्भधारणेसाठी सर्वोत्तम असतो.
ओव्हुलेशनच्या काळात नियमितपणे शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
हिरव्या भाज्या, फळे, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
योग्य व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि प्रजनन क्षमता सुधारते.
जास्त वजन किंवा खूप कमी वजन दोन्ही गर्भधारणेत अडथळे निर्माण करू शकतात.
सिगारेट, तंबाखू आणि दारूचे सेवन त्वरित थांबवा. यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.