Sanjana Hebbalkar
शेळ्या-बकऱ्याचा उपयोग साधारणत शेतीमध्ये केला जातो. पशुपालक देखील त्यांच्यापासून उत्पन्न मिळवत असतात.
अनेक पशुपालकाचं त्यांच्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम करतात. त्यांच्या प्रमापोटी हवं ते करतात. अशातच आता अकोल्यात चक्क बकऱ्यांचं मॉडेलिंग घेण्यात आलं आहे.
शक्यतो आपण मुला-मुलींच मॉडेलिंग पाहतो ऐकतो. आता मात्र चक्क महाराष्ट्रात शेळ्याचं मॉडेलिंग ठेवण्यात आलं आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट गावात जेसीआयकडून चक्क बकऱ्याच्या मॉडेलिंग स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी बकऱ्याचे मालक मोठ्य प्रमाणत बकऱ्यांना घेऊन दाखल झाले होते.
अकोटच्या बिलबिले मंगल कार्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. अनेक बकऱ्यांनी मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केला.
या स्पर्धमध्ये ६० पेक्षा जास्त बकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बकऱ्यांना सजवण्यात आलं होते.
कोणी फुगे लावले होतं तर कोणी बकरीला रंगानी सजावट केली होती. इतकचं नव्हे तर रॅम्प वॉक करताना पशुपालकांनी स्लोगनचा देखील वापर केला होता