Team Agrowon
तुम्ही बर्गर, सँडविच तर खाल्ला असेलच ना. पण याच बर्गरमध्ये कोबीसारख्या दिसणाऱ्या भाजीचं नाव तुम्हाला माहितेय का?
बर्गरमध्ये अनेक सॅलड म्हणून टोमॅटो, कांदा, लेट्यूस अशा अनेक प्रकारच्या भाज्या घातल्या जातात. पण यातल्याच लेट्यूसची शेती तुम्ही कधी पाहिलीय का?
लेट्यूसही मुळची इजिप्तमधील विदेशी पालेभाजी जगातील अनेक ठिकाणी थंड वातावरणामध्ये पिकवली जाते. भारताताही अनेक मोठ्या शहरांमध्ये लेट्यूस पालेभाजी सहज उपलब्ध आहे.
लेट्यूस हे बर्गर, सँडविच तसेच सॅलड म्हणून खाल्ले जाते. अत्यंत पौष्टिक व अँटिऑक्सिडेंट असणारी ही पालेभाजी अनेक रोगावर आणि शारीरिक समस्येवर फायदेशीर आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे.
कोबी सारखी दिसणाऱ्या या पालेभाजीच्या पानांमध्ये कोबीपेक्षा जास्त पाणी असते. तसेच ती खाताना कुरकुरीत लागते. शंभर ग्रॅम कोबीपासुन २५ कॅलरीज तर लेट्यूस पासून १४ कॅलरीज मिळतात.
कोबीच्या पानापेक्षा याची पाने हिरवीगार दिसतात. यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वे भरपूर असतात. सोबत पोटॅशियम देखील खूप असते. त्यामुळे अनेक मंडळी त्याचा आहारामध्ये वापर करतात.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, सालिअन प्रांतात फिरताना तुम्हाला शेकडो एकरवर लेट्यूसचे मळे आहेत.
सध्या या भागात या पिकाची कापणी सुरू आहे. कापणी करून या लेट्यूसचे मोठमोठ्या यंत्राच्या सहाय्याने थेट शेतातच ग्रेडींग आणि पॅकिंग करून शीतगृहात पाठवले जाते.