Gopal Hage
राज्यातील काही भागांमध्ये सध्या कापूस वेचणीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला तयारी केली आहे. कापूस वेचणीला सुरुवात करण्यापूर्वी शेतकरी पिकाचं पारंपरिक पद्धतीने पूजन करतात.
शेतकरी कापूस पिकाला दही भाताचा नैवेद्य दाखवतात. याला सीतादई पुजा असं म्हणतात.
सीतादई पुजानाने हंगामाची सुरुवात शुभ मानली जाते. एका कपाशीच्या झाडाजवळ पुजा करून वेचनीचा नारळ फोडतात.
यंदा कापूस पीक चांगलं साधू दे ! पिकाला नैसर्गिक संकट आणि कीड-रोगापासून मुक्त ठेवण्याचं साकडं शेतकरी घालत असतात.
सीतादई पुजा केल्यानंतर शेतकरी कापूस वेचणीला सुरुवात करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
राज्यातील जवळपास सर्वच कापूस उ्त्पादक भागांमध्ये कापूस वेचणीच्या आधी सीतादई पुजा केली जाते.