Team Agrowon
सरकारने सूर्यफुलाची हमीभावाने खरेदी करण्याचा मागणीसाठी हरियाणामधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चारुनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिल्ली - चंदीगड राष्ट्रीय महामार्ग शाहबादजवळ अडवला.
पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. परंतू शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून महामार्गावर ठिय्या मांडलाा.
परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
सूर्यफुलाचा हमीभाव ६ हजार ४०० रुपये आहे. पण बाजारात सध्या सूर्यफुलाला ५ हजारांपेक्षा कमी भाव मिळत आहे.
हरियाणा सरकारने भावांतर योजनेंतर्गत सूर्यफूल खरेदी करण्याचा निर्णय घेतला
शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे एक ते दीड हजार रुपयांचा फटका बसत आहे.