Reshim Sheti : म्हसोबावाडीचे शेतकरी रमले रेशीम शेतीत

Team Agrowon

रेशीम उत्पादक गाव

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या गावाची रेशीम उत्पादकांचं गाव अशी ओळख निर्माण झाली आहे.

Reshim Sheti | Sandeep Navale

रेशीम शेती अनुदान

रेशीम शेतीसाठी मिळणारा अनुदानाचा आधार योग्य मार्गदर्शन आणि बाजरपेठेची उपलब्धता यामुळे गावातील रेशीम उत्पादकांचे अर्थकारण सुधारले आहे.

Reshim Sheti | Sandeep Navale

शेतीपूरक व्यवसाय

पूर्वी गावात ऊस, कांदा पिकांसह पारंपरिक शेती केली जायची. मात्र, गावातील काही मोजके शेतकरी शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळाले.

Reshim Sheti | Sandeep Navale

रेशीम शेतीचा पर्याय

अनेक पर्यायांमधून शोधाअंती त्यांना रेशीम शेतीचा पर्याय जवळचा वाटला. सुरवातीच्या शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठा या बाबी अभ्यासून मग हळूहळू गावातील अन्य शेतकरीही याकडे वळाले.

Reshim Sheti | Sandeep Navale

रेशीम उत्पादक शेतकरी

पाच वर्षापूर्वी गावात पाच ते सहाच रेशीम उत्पादक होते. गेल्यावर्षी ही संख्या ३६ वर पोचली आहे. तर ७३ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Reshim Sheti | Sandeep Navale

तुती लागवड

तालुक्यात ३११ एकर क्षेत्रावर तुती लागवड असून त्यापैकी ३६ एकर क्षेत्र म्हसोबावाडीत आहे.

Reshim Sheti | Sandeep Navale

जिल्हा रेशीम कार्यालय

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणे शक्य झाले. शेताजवळच तुती क्षेत्रानुसार विविध आकाराचे शेड उभारले.

Reshim Sheti | Sandeep Navale

रेशीम कोष खरेदी

सुरवातीला पुण्यातील काही व्यापारी गावातील रेशीम कोषांची खरेदी करायचे. मागील वर्षापासून जिल्हा रेशीम कार्यालय व बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पुढाकाराने ई नाम पद्धतीने रेशीम खरेदी विक्री बाजाराची सुविधा सुरू झाली.

Reshim Sheti | Sandeep Navale
Punganur Cow | Agrowon