Crop Insurance : शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, अधिकाऱ्यांना दिला इशारा

Team Agrowon

शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रिसोड तहसिल कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चाला रविकांत तूपकर उपस्थित होते.

Crop Insurance | Agrowon

एआयसी या विमा कंपनीने बुलढाणा,वाशीम जिल्हासह १६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केलेली आहे.

Crop Insurance | Agrowon

शेतकऱ्यांनी प्रीमियमची रक्कम भरूनही प्रीमियमच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कंपनीने कमी रक्कम जमा केली.

Crop Insurance | Agrowon

तर दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असूनही कंपनीने त्यांच्या खात्यात एक रुपयाही टाकलेला नाही.

Crop Insurance | Agrowon

याच पार्श्वभूमीवर, एआयसी कंपनी आणि राज्य सरकारच्या विरोधात आपल्या संतप्त भावना घेऊन हजारो शेतकरी रिसोड शहरातील तहसील कार्यालयावर धडकले.

Crop Insurance | Agrowon

शेतकऱ्यांचा हक्काचा पिकविमा मिळावा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागण्या तहसीलदार एस.एन.शेलार यांची भेट घेवून रेटून धरल्या.

Crop Insurance | Agrowon
Maharashtra Kesari | Agrowon