Indrjeet Bhalerao : त्यानं चक्क बैलावरून बसून साधला लग्नाचा मुहूर्त!

Team Agrowon

बैलावर बसलेला

तिथं गेल्यावर लक्षात आलं की तो ज्यावर बसला होता ती गाय नव्हती तर तो बैल होता.अ रुणमधला पत्रकार जागा झाला.त्यानं त्याची लगेचच मुलाखत घ्यायला सुरुवात केली.तो सिंहासनावर बसलेल्या राजा सारखा बैलावर बसलेला आणि अरुण,संतोष त्याच्यासमोर उभे.मी त्यांना फोनमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतोय.पण काहीतरी तांत्रिक चूक झाली आणि आमचा व्हिडीओ अचानक नाहीसा झाला.

Animal | Indrjeet Bhalerao

गाईवरून फिरणारे

अरुणनं विचारलं गाई ऐवजी बैल का ? तर तो म्हणाला 'शेतकरी लोकांना आम्ही गाईवर बसलेलं आवडत नाही.शेतकरी गाईला माय म्हणतो.' मला आठवलं माझ्या लहानपणी आम्ही गावच्या शिवारात असे गाईवरून फिरणारे अनेक पारधी पाहिले होते. त्यानंतर आत्ताच गाईवर बसलेला पारधी मला दिसला.

Animal | Indrjeet Bhalerao

शेतात आवताच्या फेर्‍या

आम्हाला त्यांची लहानपणी भीती वाटायची. ते गायीवर बसतात म्हणून शेतकरी त्यांना पापी लोक म्हणायचे.आणि शेतात आवताच्या फेर्‍या करणाऱ्या शेतकऱ्याला पाहून पारधी म्हणायचे 'देवा कशाच्याही जन्माला घाल पण या येरझाऱ्याच्या जन्माला घालू नकोस.'

Animal | Indrjeet Bhalerao

प्राणी तो म्हणजे गाय

पारधी म्हणजे प्रामुख्याने रानपाखरं मारून खाणारे लोक.शेतात जाळे लावून,पाखरांचे आवाज काढून, पाखरांना बोलावून,त्यांना पकडणारे.रानावनात फिरणारे.हे फिरताना नांगरलेल्या रानातून,चढउतार असलेल्या रानातून वळणं घेत फिरू शकणारा एकच प्राणी तो म्हणजे गाय किंवा बैल.

Animal | Indrjeet Bhalerao

बैलावर फिरतात

बैलाची किंमत गाई पेक्षा फार म्हणून पूर्वी ते गाई विकत घ्यायचे आणि फिरण्यासाठी तिचा उपयोग करायचे.पण आता ते शेतकऱ्याचं प्रतिकूल मत अनुकूल व्हावं म्हणून बैलावर फिरतात.कारण त्यांना काही स्वतःचा शिवार नसतो.शेतकऱ्यांच्याच शेतातली पाखरं पकडावी लागतात.

Animal | Indrjeet Bhalerao

आदिम माणसाचा भाव

हा पारधी म्हणजे पोरवयातला कॉलेजचा तरुणच वाटत होता.जीनची पॅन्ट,टी-शर्ट,मोबाईल अशा वेषातला हा मुलगा दिसायला सुंदरच होता.पण चेहरेपट्टी आदिम माणसाचा भाव घेऊन वावरणारी. तसा तो सातवीपर्यंत शिकलेला होता,एका आश्रमशाळेत.

Animal | Indrjeet Bhalerao
Shewaga | Agrowon