Team Agrowon
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या दोन दिवसांपासून तुरीची आवक वाढली आहे.
तुरीची बाजार भाव हा सरासरी ७५०० रु असतांना आज आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी ६००० - ६२०० रु.भावाने तुरीची खरेदी सुरू केली.
त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.
स्वाभिमानी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राऊत,सचिन शिंगोटे,निलेश नारखेडे व संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केली.
खरेदी बंद पाडली व नॅशनल हायवे क्र.६ वर रास्तारोको सुरु केला.
शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनापुढे व्यापारी व प्रशासनाला झुकावे लागले व आता व्यापाऱ्यांनी तुरीची सरासरी ७५०० रु.भावाने खरेदी सुरू केली आहे.