Kharip Meeting : खरीप आढावा बैठकीत शेतकऱ्याचा संताप अनावर

Team Agrowon

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या धोकादायक व्यवस्थेमुळे आपल्या विवाहित मुलाचा विजेच्या धक्‍याने मृत्यू झाला. इतकी गंभीर घटना घडूनही त्या ठिकाणी अजूनही महावितरणची व्यवस्था सुधारली नसल्याची गंभीर बाब सावखेड गंगा येथील शेतकऱ्याने खरीप आढावा बैठकीत मांडली.

Kharip Meeting | Agrowon

ती मांडत असताना महावितरणच्या बेफिकीर व्यवस्थेचे कीती गंभीर परिणाम भोगावे लागतात याची जाणीव आढावा बैठकीला उपस्थित पालकमंत्र्यांसह खरीप जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना करून देण्याचा प्रयत्न केला.

Kharip Meeting | Agrowon

महावितरण आणि पीक विमा कंपनीच्या कारभाराच्या चिंधड्या उडविणारी मांडणी उद्‌वीग्‌न होउन सावखेडगंगा ता. वैजापूर येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबासाहेब थेटे यांनी केली.

Kharip Meeting | Agrowon

श्री. थेटे म्हणाले, मी सावखेडगंगाचा,गोदावरी तीरावरचा. विमा कंपनीनं पंचनामे केले,आम्ही सुद्‌धा पैसे भरले एक रूपया कुणाला दिला नाही. पुर्ण जमीन नापेर राहती, मी खासदार जलील साहेबा कलेक्‍टर हापीस समोर दोन वेळेस बोललो साहेब गोदावरीच्या तीरावर तुम्ही एक वेळेस या ही परस्थिती पहायला.

Kharip Meeting | Agrowon

बागडे नानांनी महावितरणचे प्रश्‌न मांडले. साहेब दोन वर्ष झाले कालच्या तारखेला, माझा लग्‌न झालेला मुलगा लाईनला चिटकून मेला. इथं महावितरणचे साहेब आहे, मी दोन वर्षापासून सांगतो या इथं लाईनला कटपॉईंट व्यवस्थीत काढा. साहेब आता येउन बघा तुम्ही, आतापर्यंत दोन वर्षात कटपॉईंट नाही काढता आला.

Kharip Meeting | Agrowon

अगोदर मुलगा मेला,आता बाप मरायचा असल त असं करणारे जे कुणी अधिकारी असतील त्यांना आधी काढून दिलं पाहीजे. आमचा जीव तळतळतो, यांना फूकट काय नाही लागत. बील भरतो नं साहेब आम्ही, असे नाही ना.

Kharip Meeting | Agrowon
apple | Agrowon