Vegetable Market : भाजीपाल्याची थेट विक्री ठरतेय फायदेशीर

Team Agrowon

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर दर कमी होतात. सध्या शेतकऱ्यांना हा अनुभव येतच आहे. जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

काही शेतकरी मात्र आपल्या ताज्या भाजीपाल्याची थेट विक्री करत आहेत. भाजीपाला ताजा आणि कमी दरात मिळत असल्याने ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील शेतकरी विनय कदम यांनी थेट भाजीपाल्याची विक्री सुरु केली. त्यांच्या या विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कदम यांच्या शेतातील हरभऱ्यामध्ये दाणे भरले आहेत. त्यामुळे त्यांना हरभरा विक्रीही सुरु केली. या हरभऱ्याला खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड दिसून येत आहे.

हिरव्या हरभऱ्याला ग्राहकांची चांगली पसंती असते. हे हेरून विनय कदम यांनी सव्वा एकरमध्ये हरभरा घेतला. त्यांचाा हरभराही यंदा चांगला आला.

स्वतः छोट्या टेम्पोतून आसपासच्या गावांंमध्ये फिरून भाजीपाला आणि हरभरा विकत आहे. ग्राहकांनाही ताजा माल मिळतो. हरभऱ्याला दहा रुपये पेंडीप्रमाणे सध्या दर मिळत आहे, असे कदम यांनी सांगितले.

cta image
क्लिक करा