Sugarcane Crop: खोडवा उसाची तयारी

Anil Jadhao 

सध्या ऊस गळीत हंगाम जोमात सुरु आहे. शेतकऱ्यांचा ऊस तोडण्याची गतीही जास्त आहे.

आडसाली लागण ऊस तुटलेले आहेत. आता ऊसतोड झाल्यानंतर पुढचा हंगाम म्हणजे खोडवा.

कोल्हापूर येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी खोडवा उसाची तयारी सुरु केली आहे.

शेतातील आडसाली ऊस तोडणी झालेली आहे त्यांनी आता खोडवा व्यवस्थापन चालू केले आहे.

पाटील यांनी पाचट कुटी करून घेतलेली आहे. आता पुढच्या टप्प्यात ते उसाचे बुडखे छाटून घेण्याचे काम करत आहेत.

बुडखे छाटल्याने पुढच्या टप्प्यात उसाला फुटवा चांगला येतो. त्यामुळे हे काम गतीने केले जात आहे.

cta image