Team Agrowon
मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यात गेल्या सात वर्षांपासून राबविली जात आहे.
मात्र, राज्य सरकारकडून योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे चित्र आहे.
चालू वर्षात सरकारने योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करण्याची आवश्यकता होती.
मात्र, यापैकी केवळ सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
आधीच्याच प्रस्तावांना पुरेसा निधी द्यायचा नाही. तसेच आलेले प्रस्ताव लवकर मंजूर केले जात नसताना वरून मागेल त्याला शेततळे अशी घोषणा करायची हा विरोधाभास आहे.
२०१७ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे योजना’ ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच संकल्पनेतून पुढे आली होती.
अनुदान कमी असतानाही शेतकऱ्यांनी गरजेपोटी मोठ्या संख्येने तळी खोदली.