Roshan Talape
कांद्यामधून एक विशिष्ट वायू (सॅल्फर कंपाउंड) निघतो, जो डोळ्यांच्या संपर्कात आला की चुरचुर होऊन पाणी येते.
त्यामुळे कांदा कापताने ओला कपडा कांद्याजवळ ठेवला, तर कांद्यातील वायू त्यामध्ये अडकतो आणि डोळ्यांवर परिणाम होत नाही.
तसेच तोंडात पाणी ठेवल्यामूळे कांद्यातील वायू श्वासातून आत जात नाही.
स्वयंपाकघरामध्ये पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा, जेणेकरून कांद्यातील वायू बाहेर फेकला जाईल.
कांदा कापण्याआधी कांदा थंड केल्याने त्यातून निघणारा वायू कमी होतो, त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.
त्याचबरोबर कांदा पाण्यात भिजवावा यामुळे कांद्याचे थर ओले झाल्यामुळे वायू बाहेर पडणं कमी होते.
कांदा कापण्यासाठी धारदार सुरीचा वापर केल्यामुळे कांदा पटकन कापला जातो आणि त्यातील वायू कमी प्रमाणात निघून डोळ्यांना त्रास कमी होतो.
कांदा चिरताना चष्मा घातल्यास डोळ्यांना त्रास होत नाही.