टीम ॲग्रोवन
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनपासून नजीक भवरापूर येथील सुभाष साठे यांनी मुले गौरव व तेजस यांच्या मदतीने ‘स्वीट कॉर्न’ व अन्य शेतमाल प्रक्रिया प्रकल्प (Sweet Corn Project) आकारास आणला आहे.
गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादनाच्या निर्मितीतून सहा देशांना निर्यात यशस्वी करून वर्षाला १४ कोटींची उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
पुणे शहरापासून काही किलोमीटरवर उरुळी कांचन हे प्रसिद्ध गाव आहे. येथून जवळचभवरापूर गाव आहे. येथील सुभाष साठे यांची वडिलोपार्जित १० ते १२ एकर शेती आहे.
सुरुवातीला बंगळूर, दिल्ली आदी ठिकाणी उत्पादने पाठवली जायची. होते. मात्र परदेशातील मागणी व संधी लक्षात घेऊन त्यावरच लक्ष केंद्रित केले. साठे यांचा मोठा मुलगा गौरवने ‘एमबीए’ केले आहे
त्यानेच परदेशातील मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली आहे. तो म्हणाला, की सुरवातीला निर्यातदारांमार्फत आमची उत्पादने परदेशात जायची. त्यामुळे आमच्या गुणवत्तेबाबत आत्मविश्वास आला.
‘बीटू बी’, अपेडा, राजदूतावास यांच्यासोबत संपर्क वाढवले. एकेका दिवशी असंख्य ई-मेल्स पाठवून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.
आज या प्रयत्नांतून सौदी अरेबिया, दुबई, रशिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, कॅनडा अशा सहा देशांमध्ये माल निर्यात होत आहे.
कंपनीच्या माध्यमातून परिसरासह १५० लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यातून या लोकांना कुटुंबाला चांगलाच हातभार लागला आहे.