Red Banana : अस्सल लाल केळीची चव चाखली का? या ठिकाणी होते उत्पादन

Team Agrowon

भारतातील विविध राज्यांत उत्पादित होणाऱ्या एकूण सहा केळींच्या पारंपरिक जातींना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगावची केळी, कर्नाटकमधील कमलापूर लाल केळी आणि नंजनगुड केळी आहे.

Red Banana | Agrowon

कमलापूरमध्ये पिकणारी आणि लाल रंगामुळे या केळीला कमलापूर लाल केळी या नावाने ओळखले जाते.

Red Banana | Agrowon

सुगंध आणि गोडपणा यामुळे ही केळी विशेष अाहे. या केळीत गोडवा अधिक आहे.

Red Banana | Agrowon

केळीचे उत्पादन पारंपरिक व सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. उपयोग विविध व्याधींवर औषधी म्हणूनही केला जातो.

Red Banana | Agrowon

नंजनगुड या केळीची लागवड म्हैसूर जिल्ह्यातील या तालुक्यातील दहा गावात, तर चामराजनगर जिल्ह्यातील काही गावामध्ये केली जाते.

Red Banana | Agrowon

केळीचे उत्पादन पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने केले जाते. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे टिकून आहे. त्यामुळे केळीची चव स्वादिष्ट आणि अद्वितीय आहे.

Red Banana | Agrowon