Roshan Talape
अंडी आणि पनीर दोघेही प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. पण नेमकं जास्त प्रोटीन कशात आहे ते पाहूयात?
१०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रोटीन असते. पनीर हे दूधापासून बनवले जाते.
एका मध्यम अंड्यात सुमारे ६ ग्रॅम प्रोटीन असते. अंड्याचा पांढरा भाग प्रथिनांनी भरलेला असतो.
अंडं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते, तर पनीर स्नायू वाढवण्यासाठी मदत करते.
शाकाहारी लोकांसाठी पनीर हा उत्तम प्रथिनांचा पर्याय आहे, तर अंडं खाणाऱ्यांसाठी अंडं हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे.
अंडं लवकर पचते, तर पनीर थोडं जड असते आणि काही लोकांना ते सहज पचत नाही.
अंड्याचे प्रोटीन पूर्ण मानले जाते, कारण त्यात सर्व आवश्यक अमिनो आम्ल असतात. पनीरमध्येही चांगल्या दर्जाचे प्रोटीन असते.
पनीरमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, पण अंड्याचं प्रोटीन अधिक प्रभावी आणि लवकर पचणारे असते.