sandeep Shirguppe
महाराष्ट्रातील नामांकीत शिवाजी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology) विभागाकडून कंपवातावर शेपूची भाजी गुणकारी असल्याचे संशोधनातून सिद्ध केले आहे.
शेपूच्या भाजीत असलेल्या ‘एल-डोपा’ घटकामुळे मेंदूचे आरोग्य चांगले चालते असा निष्कर्ष शिवाजी विद्यापिठातील प्रो. डॉ. ज्योती जाधव, प्रो. डॉ. विश्वास बापट यांनी संशोधन करून काढला आहे.
शेपूची भाजी पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात बाजारात येते दरम्यान या भाजीतील नव्या संशोधनामुळे आपल्या जीवनातील महत्त्व वाढले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षण व संतुलन राखण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील यात महत्त्वपूर्ण व अलौकिक गोष्टी समोर आणल्या आहेत.
मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो, त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश होतो. त्या विकृतीला कंपावात असे म्हणतात.
यामध्ये हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे व शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे, ही कंपवाताची मुख्य लक्षणे आहेत.
शेपूच्या भाजीमध्ये ‘एल-डोपा’ हा घटक आहे. त्यामुळे शेपूमधील या बायोअॅक्टिव्ह घटकासोबत बरेच मुख्य घटकाला उपयुक्त असणारे उपघटकदेखील आहेत.
विविध प्रकारची मूलद्रव्ये फिनॉलिक्स, फॅबोनाईडस् आहेत. जे ऑक्सिडेटिव्ह ट्रेस, इन्ल्फीमेशन (दाह) कमी करण्यास मदत करतात.
जैवतंत्रज्ञान विभागातील अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये ‘एल-डोपा’ या औषधामुळे कंपविकाराच्या सुरुवातीस आश्चर्यकारक बदल दिसून आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.