Anuradha Vipat
डोळे येणे झाल्यास सर्वात महत्त्वाचा प्रथमोपचार म्हणजे डोळ्यांना थंड किंवा कोमट पाण्याचा शेक देणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आय ड्रॉप्स वापरणे.
डोळे येणे हा आजार विषाणू किंवा जिवाणूंमुळे होतो आणि तो अत्यंत संसर्गजन्य असतो.
थंड शेकमुळे खाज आणि जळजळ कमी होते, तर कोमट शेकमुळे डोळ्यांना आलेली चिकट सूज साफ होते.
डोळ्यांची आग कमी करण्यासाठी शुद्ध गुलाब पाण्यात कापसाचे बोळे भिजवून ते डोळ्यांवर ठेवल्यास थंडावा मिळतो
डोळ्यांवर काकडीचे गोल काप ठेवल्याने जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते.
मेडिकलमधून 'आर्टिफिशियल टीअर्स' आणून टाकल्यास डोळ्यांमधील खुपखुपणे कमी होते.
डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे किंवा चोळणे पूर्णपणे टाळा. यामुळे संसर्ग वाढतो आणि दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होऊ शकतो.