Anuradha Vipat
उलटी आणि जुलाब झाल्यास शरीरातील पाणी वेगाने कमी होते, म्हणून शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि ओआरएसचे पाणी पिणे हा सर्वात मोठा घरगुती उपाय आहे
एका ग्लास पाण्यात १ चमचा साखर आणि एक चिमूटभर मीठ मिसळून ओआरएस द्रावण तयार करा आणि ते थोडे थोडे प्या.
आल्याचा तुकडा आणि पुदिन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी कोमट करून प्यायल्याने उलट्यांची भावना लगेच कमी होते.
जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिण्याने पोटातील गॅस, कळा आणि जुलाब थांबण्यास मदत होते.
ताकामध्ये थोडे भाजलेले जिरे आणि काळे मीठ टाकून पिण्याने पोटातील जंतुसंसर्ग कमी होतो.
जुलाबामुळे शरीरातील पोटॅशियम कमी होते, केळे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते.
पांढरा मऊ भात किंवा ताकासोबत भात खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो.