Farmer Success Story : वेलवर्गीय पिकांच्या उत्पादनातून साधली आर्थिक प्रगती

Team Agrowon

शेतीचे तंत्र

अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील पातालबंशी कुटुंबाने वेलवर्गीय पिकांच्या शेतीचे तंत्र चांगलेच अवगत केले आहे.

Vegetable Farming | Gopal Hage

उत्पन्नाचा प्रमुख स्रोत

उन्हाळी व रब्बी हंगामात बाजारपेठेतील मागणीप्रमाणे या पिकांचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यानेच ही पिके कुटुंबाच्या अर्थकारणाचा प्रमुख स्रोत बनली आहेत.

Vegetable Farming | Gopal Hage

सिंचन सुविधा

सिंचनाच्या सोयीसुविधा असल्याने शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य होते.

Vegetable Farming | Gopal Hage

एकत्रित शेती

श्यामलाल व रामलाल या पातालबंशी बंधूंची १२ एकर एकत्रित शेती आहे. यापैकी १० एकरांत सिंचनाची सोय आहे.

Vegetable Farming | Gopal Hage

संपूर्ण कुटूंब शेतीत

श्यामलाल यांचा मुलगा करण मुक्त विद्यापीठातून कृषी पदवीधर झाला असून, तो काही वर्षांपासून शेतीत कुटुंबीयांसह राबतो.

Vegetable Farming | Gopal Hage

वेलवर्गीय पिके

खरिपात कापूस, सोयाबीन आदी पिके होत असली तरी वेलवर्गीय पिके ही या कुटुंबाच्या अर्थकारणाचा मुख्य स्रोत झाली आहेत.

Vegetable Farming | Gopal Hage

भाजीपाला पिकांचे नियोजन

पातालबंशी कुटुंब प्रामुख्याने उन्हाळी व रब्बी अशा दोन हंगामांत वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे नियोजन करते.

Vegetable Farming | Gopal Hage

आठवडी बाजारात विक्री

पिकविलेल्या भाजीपाला व्यवस्थित प्रतवारी, स्वच्छता करून अकोलासह मूर्तिजापूर, बोरगावमंजू येथील आठवडी बाजारात विक्रीस नेण्यात येतो.

Vegetable Farming | Gopal Hage
turkey Bajari Variety | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...