Team Agrowon
आपले स्वतःचे घर बांधण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण बांधकाम साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे स्वप्नातलं घर बांधणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही.
अहमदनगरमधल्या एका अवलिया शिक्षकांने आपलं घरं बांधत असताना लोखंडाचा वापर न करता अत्यंत कमी खर्चात दुमजली इमारत उभी केली आहे
हे घर बांधण्यासाठी शिक्षक सतीश गुगळे यांनी लोखंडाऐवजी बांबूचा वापर केला आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात 35 ते 40 टक्के बचत झाली.
त्यांनी हे घर बांधत असताना कॉलम पासून ते स्लॅबपर्यंत लोखंडाच्या सळ्याऐवजी बांबूचा वापर केला आहे.
त्यांनी बांबूची मजबूतता तपासण्यासाठी या बांबूची पुणे आणि अहमदनगर येथे लॅब टेस्टिंग देखील करून घेतली.
घऱाच्या आवारात त्यांनी सेफ्टिंग टॅंक आणि बायोगॅस प्रकल्प उभा केला. त्यातून निर्माण झालेल्या इंधनाचा ते घरात वापर करतात. त्यांच्या या प्रयोगाला भारत सरकारने पेटेंट दिले आहे.
फ्लोरिंग स्लॅबमध्ये कामट्यांच्या जाळ्यांबरोबरच विटांच्या तुकड्यांचा वापर झाल्याने वाळू सिमेंट मिश्रणामध्येही बचत झाली आहे.
गुगळे कुटुंबीय जवळपास 11 वर्षे झाली याच घरात राहत असून हे घर सुस्थितीत आहे. त्यांच्या घराची रचना आणि जीवनशैली इतरांना शाश्वत जीवन जगायला शिकवते.